प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना (pradhanmantri Vishwakarma scheme) ही भारत सरकार द्वारे सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये देशातील पारंपारिक कारागीर आणि हस्त शिल्पकारांना आर्थिकदृष्ट्या सशक्त बनवण्याचा आणि त्यांच्या कौशल्याला प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे. जे पिढी दर पिढी (traditional skills development) आपले पारंपरिक कौशल्य पुढे नेत आहेत,त्यांच्यासाठी ही योजना एक वरदान ठरू शकते. या योजने अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. टूल किट खरेदी करण्याच्या उद्देशाने, त्यांच्या बँक खात्यावर पंधरा हजार रुपये देखील पाठवले जातील.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत विश्वकर्मा समाजातील सर्व लोकांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे. याशिवाय झाली या लोकांना स्वतःचे व्यवसाय करायचा असेल, त्यासाठी सरकार त्यांना केवळ पाच टक्के व्याजदर आणि तीन लाख रुपये पर्यंतचे कर्जही देईल. ही कर्जाची रक्कम त्यांना दोन टप्प्यात उपलब्ध करून दिली जाईल पहिल्या टप्प्यात एक लाख रुपये दिले जातात आणि उर्वरित दोन लाख रुपये ची रक्कम त्यांना दुसऱ्या टप्प्यात दिली जाते.
PM Vishwakarma Yojana योजनेचा उद्देश
देशात असे अनेक लोकांचे चालू असलेल्या योजनांपासून वंचित राहतात. आणि त्यांना चांगले प्रशिक्षण देखील उपलब्ध होत नाही, या विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की विश्वकर्मा समाजातील सर्व जातींना योग्य प्रशिक्षण द्यावे ज्या रोजगारासाठी त्यांना कमी पैसे द्यावे लागतात ते देखील व्याजदरावर दिले जाते.
ज्या लोकांकडे चांगल्या प्रशिक्षणासाठी पैसे नाहीत पण खूप चांगले कार्य आहेत, अशा लोकांना सरकारी योजनेअंतर्गत आर्थिक लाभ ही देते योजना विशेषतः विश्वकर्मा समाजातील लोकांसाठी वरदान आहे.
- कारागीर आणि हस्त शिल्पकार यांची विश्वकर्मा म्हणून ओळख निर्माण करणे आणि त्यांना योजनेतील सर्व लाभ मिळण्यास पात्र बनवणे.
- त्यांची क्षमता, उत्पादकता आणि उत्पादनाची गुणवत्ता वाढवण्यासाठी चांगले आणि आधुनिक साधनांसाठी समर्थन प्रदान करणे.
- कौशल्य सुधारण्यासाठी आणि त्या संबंधित आहे योग्य प्रशिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य अपग्रेडेशन प्रदान करणे.
- या विश्वकर्माचा डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल व्यवहारासाठी प्रोत्साहन देणे.
- ब्रँड प्रमोशन आणि मार्केट लिंकेजसाठी प्लॅटफॉर्म प्रदान करण्यासाठी त्यांना वाढीच्या नवीन संधीमध्ये प्रदेश करण्यास मदत करणे.
फायदे (Benefits):
व्यवसायासाठी आपण हजार रुपये पर्यंतचे उपकरण खरेदी करण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये तीन लाख रुपये पर्यंत कर्ज मिळते. एक लाख पर्यंतचे कर्ज पहिल्या टप्प्यात आणि दोन लाख पर्यंतचे कर्ज दुसऱ्या टप्प्यात व्याज दराने दिले जाते. पारंपरिक कौशल्य वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. प्रगत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातील. प्रशिक्षणानंतर अधिकृत प्रमाणपत्र दिले जाईल जे उमेदवार त्यांच्या व्यवसायासाठी उपयुक्त ठरेल. पारंपरिक उत्पादनासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा संपर्क वाढवण्यासाठी सहकार्य, डिजिटल प्लॅटफॉर्म द्वारे व्यवसाय सुलभ करण्यासाठी मदत होते. तसेच विविध सरकारी योजनांचा प्राधान्याने लाभ मिळतो.
आवश्यक कागदपत्रे |Documents
- अर्जदाराचे आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्यांच्या आधार कार्ड
- अर्जदाराचे आणि त्याचे कुटुंबातील सदस्याचे कोणतेही वैध ओळखपत्र जसे की., पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र.
- अर्जदाराचे आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची जन्म प्रमाणपत्र
- अर्जदाराचा आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचा निवास प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र
- अर्जदाराचा व्यवसाय प्रमाणपत्र
- अर्जदाराचे बँक खाते विवरण.
- अर्जदाराचा आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
- प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा अर्ज फॉर्म , ज्यावर अर्जदाराची माहिती आणि त्याच्या कुटुंबाचे सदस्याची माहिती भरली जाईल.
पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पात्रता:
- अर्जदार हा भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षे पेक्षा कमी असावे.
- मान्यताप्राप्त संस्थेचे संबंधित ट्रेड चे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या 140 जातींपैकी एक असणे आवश्यक आहे.
- ही योजना लाभार्थी कुटुंबातील एका सदस्यालाच होईल.
- कुटुंबातील सदस्यांची म्हणजेच अर्जदाराची कोणतीही सरकारी खात्यामध्ये कार्यरत नसावा.
या योजनेमध्ये उद्योगांचा आणि कौशल्याचा समावेश आहे ती खालील प्रमाणे आहे
1.सुतार काम
2.लोहार काम
3.कुंभारकाम
4.सोनार काम
5.धोबी
6.मच्छिमार जाळी तयार करणे
7.चर्मकार
8.न्हावी
9.गारमेंट तयार करणे
10.बासरी आणि ढोल,तबला इत्यादी
ऑनलाइन अर्ज कसा करावा? |How to apply for PM Vishwakarma Yojana
जर तुम्हाला प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्याची सर्व प्रक्रिया खाली स्पष्टपणे दिलेली आहे,
- सर्वप्रथम तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागेल.
- अधिकृत वेबसाईटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज करा या बटनावर क्लिक करावे लागेल.
- त्यानंतर तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरा आणि CSC पोर्टल वर लॉगिन करा.
- जिथे या योजनेसाठी अर्ज करण्याचा अर्ज तुमच्यासमोर उघडेल.
- सर्वप्रथम तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि आधार क्रमांक टाकून या अर्जाची पडताळणी करावी लागेल. त्यानंतर स्क्रीनवर दिलेल्या सूचनानुसार तुम्हाला अर्ज भरावा लागेल.
- काही आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति तिथे अपलोड करावे लागतील.
- त्यानंतर तुम्हाला पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र डाऊनलोड करण्याचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा आणि तुमचे प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
- या प्रमाणपत्राच्या आत तुम्हाला तुमचा विश्वकर्मा डिजिटल आयडी मिळेल जो तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
- यानंतर तुम्हाला लॉगिन बटणावर क्लिक करावे लागेल, येथे तुम्हाला नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर चा वापर करून ब्लॉग इन करावा लागेल.
- यानंतर, या योजनेसाठी अर्ज करण्याचा मुख्य अर्ज तुमच्यासमोर उघडेल. यामध्ये तुमच्याकडून अनेक प्रकारची माहिती विचारली जाईल ती तुम्हाला काळजीपूर्वक टाकून योजनेसाठी अर्ज करावा लागेल.